नवी मुंबईत अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून संबंध ठेवणाऱ्या नराधमला अटक

पीडित 17 वर्षीय मुलगी उल्वे सेक्टर 2 मधील रहिवासी असून घरकाम करते. मुलीची चार महिन्यांपूर्वी एका 30 वर्षीय तरुणाशी ओळख झाली होती. या ओळखीचे मैत्रीत रुपांतर झाले. त्यानंतर नराधमाने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्या शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलगी गरोदर राहिली.

नवी मुंबई : अल्पवयीन मुली (Minor Girl)ला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शारिरीक संबंध प्रस्थापित करणाऱ्या एका 30 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. शारिरीक संबंधातून मुलगी दोन ते अडीच महिन्यांची गरोदर आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस पुढील कारवाई करीत आहेत

पीडितेच्या आईला कळताच तिने पोलिस ठाणे गाठले

पीडित 17 वर्षीय मुलगी उल्वे सेक्टर 2 मधील रहिवासी असून घरकाम करते. मुलीची चार महिन्यांपूर्वी एका 30 वर्षीय तरुणाशी ओळख झाली होती. या ओळखीचे मैत्रीत रुपांतर झाले. त्यानंतर नराधमाने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्या शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलगी गरोदर राहिली. हा संपूर्ण प्रकार मुलीच्या आईला कळताच आईने त्वरित एनआरआय पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता आरोपीने तिला काम करत असलेल्या सलूनच्या मागच्या रुममध्ये नेऊन शरीरसंबंध ठेवले. यातून ती दोन ते अडीच महिन्यांची गरोदर असल्याचे कळले. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करुन त्याच्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. सध्या आरोपीला पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e