सीसीटीव्हीत घटना कैद
एकतर्फी प्रेमातून झालेल्या या हत्येनं शहरात खळबळ माजली असून कॉलेज परिसरातील काही सीसीटीव्हींमध्ये ही घटना कैद झाली आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण विद्यार्थिनीला जबरदस्तीने ओढत घेऊन जाताना दिसतोय. तिच्या पाठीवर मोठी सॅक दिसतेय. घटनास्थळावर दाखल झालेल्या पोलिसांना तरुणीचा मृतदेह आढळला. तरुणीच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणाही होत्या.
भीती, चिंता आणि संतप्त प्रतिक्रिया
देवगिरी कॉलेज परिसरात घडलेल्या या घटनेची बातमी संपूर्ण शहरात पसरली असून विद्यार्थिनींमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पालक वर्गातूनही घडल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. मृत तरुणी ही 19 वर्षांची असून ती बीबीएच्या प्रथम वर्षात शिकत होती, अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
0 Comments