2018 सालचं हत्याकांड काय होतं?
शहरातील एमजीएम कॉलेजमधील वसतीगृहात राहणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थिनीवर 10 डिसेंहर 2018 रोजी अत्याचार करून तिची क्रूर हत्या करण्यात आली होती. रात्री साडेअकरा वाजता इतर मैत्रिणींना बाय करून ती खोलीत गेल्याचे सीसीटीव्हीत दिसले. त्यानंतर 20 तास ती बाहेरच आली नव्हती. त्यामुळे होस्टेल अधीक्षकांनी खोलीत जाऊन पाहिले असता मुलगी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत होती. आधी तिनं आत्महत्या केल्याचं बोललं गेलं. मात्र नंतर पोस्टमॉर्टेम अहवालानरून तिचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाले. चार-पाच महिन्यांनी फॉरेन्सिक अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचंही सिद्ध झालं. सिडको पोलीस ठाण्यात सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांववरून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले देखील. या प्रकरणी मूळ उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेला संशयित राहूल शर्मा याला अटक करण्यात आली होती. तो बाजूच्याच भागात बांधकाम साइटवर कामाला होता. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने मृत तरुणीच्या गळ्यातील चैनही उत्तर प्रदेशातील घरातून काढून दिली. मात्र एवढं असूनही राहुलचा या प्रकरणातील सहभाग न्यायालयात सिद्ध करता आला नाही. औरंगाबादच्या या निर्भयाचा खूनी कोण? हा प्रश्नही गूढच राहिला..
शनिवारी आणखी एक लेक गमावली
एमजीएमच्या निर्भयावरील अत्याचारातील दोषींना शिक्षा कधी होईल, हे मोठं प्रश्नचिन्हं समोर असतानाच देवगिरी कॉलेजमध्ये आणखी एक भयंकर घटना घडली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास बीबीए प्रथम वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा एकतर्फी प्रेमातून खून करण्यात आला. ग्रंथी सुखप्रीत कौर प्रितपालसिंग असं या मृत तरुणीचं
नाव आहे. दुपारच्या वेळी भर कॉलेजमधून तिला 200 फूट ओढत नेत नराधमानं तिच्यावर चाकूने वार केलं. घटनास्थळी पोलीस दाखल झाले, तोवर तरुणी मृतावस्थेत होती. तिच्या शरीरावर धारदार शस्त्राच्या खुना होत्या. या घटनेतही सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण तिला बळजबरीने घेऊन जाताना दिसतोय. या आरोपीपर्यंत पोलीस कसे पोहोचतात, त्याच्यावरील गुन्हा सिद्ध होण्यास किती काळ जाणार हाही मोठा प्रश्न आहे
0 Comments