गुन्ह्यातील साक्ष मागे घेण्यासाठी गाडीत ठेवले ड्रग्स; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

उल्हासनगर-शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  गुन्ह्यातील साक्ष मागे घेण्यासाठी एका दुचाकीत ड्रग्स ठेवण्यात आले होते. गाडीत ड्रग्स असल्याची पोलिसांना माहिती देणारेच आरोपी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
दुचाकीत ड्रग्स असल्याची माहिती उल्हासनगर मधील बांधकाम व्यावसायिक नंदलाल वाधवा यांनी पोलिसांना दिली होती.  नंदलाल वाधवा आणि त्याचा मुलगा राम वाधवा या दोघांनी आपल्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने रवी तलरेजा या तरुणाच्या दुचाकीमध्ये ड्रस ठेवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे
या प्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी राम, नंदलाल वाधवा आणि इतर दोन जणांविरोधात एन. डी. पी एस ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच राहुल शर्मा याला अटक केली आहे. तसेच तीन जणांचा पोलीस शोध घेत आहेत.  28 एप्रिलला रवी तलरेजा या तरुणाच्या नंबर प्लेट नसलेल्या दुचाकी वाहतूक पोलिसांनी कारवाई करत वाहतूक कार्यालयात आणल्या होत्या. मात्र पोलीस दुचाकी पोलीस ठाण्याला आणल्यानंतर बांधकाम व्यावसायिक  नंदलाल वाधवा तिथे आला आणि दुचाकीत ड्रग्स असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावेळी दुचाकीच्या डिक्कीत ड्रग्स चे पॅकेट पोलिसांना आढळले. यात मध्यवर्ती पोलिसांनी खोलवर तपास केल्यानंतर हे ड्रग्स नंदलाल वाधवा आणि त्याचा मुलगा राम वाधवा यांनीच आपल्या साथीदारांच्या मदतीने रवी तलरेजा याच्या दुचाकीत ड्रग्स ठेवल्याचे पोलीस तपासात समोर आले. 
 रवी यांचे वडील राजेश तलरेजा यांच्या जमिनीच्या व्यवहारात वाधवा पिता पुत्रांनी खोटे कागदपत्रे तयार केली होती. त्या प्रकरणात राजेश यांनी नंदलाल आणि राम वाधवा यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात साक्ष दिली होता, ही साक्ष मागे घ्यावा यासाठी राम आणि नंदलाल हे राजेश तलरेजा यांच्यावर विविध मार्गाने दबाव आणत होते. अखेर साक्ष मागे घेत नसल्याने वाधवा पिता पुत्राने राजेश यांच्या मुलगा रवी याच्या गाडीत ड्रग्स ठेऊन त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला होता. हा सगळा बनाव त्यांनी फिल्मी स्टाईल ने केला होता. अखेर पोलिसांनी राम आणि नंदलाल या पिता पुत्राचा बनाव समोर आणला. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी राहुल शर्मा याला अटक केली असून त्याला 23 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e