४५ दिवसांत ४९ घरफोड्या, चोरीच्या गुन्ह्यात १ कोटी १४ लाखांचा ऐवज चोरीस

नाशिक: नाशिक शहरात (Nashik City) चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ झाली असून १ एप्रिल ते १५ मे या ४५ दिवसांच्या कालावधीत घरफोडी आणि चोरीच्या ४९ गुन्ह्यात तब्बल १ कोटी १४ लाख ५३ हजारांचा ऐवज चोरी करण्यात आला आहे.  नाशिक शहर व परिसरात घरफोडी, चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. उघड्या घरातून आणि बंद घराचा कडी कोंडा तोडून चोरी व घरफोडीचे गुन्हे घडत असल्याचे समोर आले आहे. उपनगर, पंचवटी, अंबड या पोलिस ठाण्याच्या हद्दित हे गुन्हा घडले आहेत. 
४९ घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ज्यात पंचवटी- ६, गंगापूर-२, आडगाव-४, मुंबई नाका-५, सरकारवाडा-४, म्हसरुळ-२, नाशिक रोड-३, उपनगर-७, देवळाली कॅम्प- ३, अंबड- ६, सातपूर- ४, इंदिरानगर- २ अशी गुन्ह्यांची नोंद नाशिकच्या विविध पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, त्यामुळे आता नाशिक पोलिसांनी शहरातील महत्वाच्या भागात दररोज बेरेंगेटिंग करत वाहनांची तपासणी केली जात आहे. मात्र असे असले तरी देखील चोरांनी आणि चैन स्नॅचर्सनी मागील काही दिवसांत जणू काही पोलिसांना आव्हानंच दिले होते की काय असा प्रश्न सर्व सामान्यांना पडत आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e