केवळ आडनावावरून जात ओळखणे चुकीचे ; भुजबळांनी ओबीसी आयोगाला फटकारले

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनस्र्थापित करण्यासाठी ओबीसींची सांख्यिकी माहिती जमा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाकडून आडनावावरून जातीची नोंद करण्यास केली जात असल्याची तक्रार आहे. त्यावर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. केवळ आडनावावरून जात ओळखणे चुकीचे आहे, अशा शब्दात त्यांनी आयोगाला फटकारले आहे.  राज्यातील ओबीसींची सांख्यिकी माहिती जमा करून अहवाल सादर करण्यासाठी माजी मुख्य सचिव जयंत बांठिया यांच्या अध्यक्षतेकाली समर्पित आयोग स्थापन केला आहे. मात्र काही ठिकाणी आडनावावरून जात गृहीत धरली जात असल्याची बाब समोर येत आहेत. अशी पद्धत चुकीचे असून यात सर्वपक्षीयांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. 

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e