सांगली : जॉगिंगसाठी गेलेल्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्यावर आज (शुक्रवार) अज्ञातांनी हल्ला केला. मार्शल आर्टमध्ये तरबेज असलेल्या गेडाम यांनी हा हल्ला परतावून लावत दाेघांना घटनास्थळावरुन पळवून लावले. दरम्यान गेडाम यांनी या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार नाेंदवली आहे. पाेलीसांनी दाेन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करीत तपासाची चक्रे फिरवली आहेत
आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या घटनेबाबत हर्षलता गेडाम यांनी साम टीव्हीला माहिती देताना मी नेहमीप्रमाणे जॉगिंगसाठी विश्रामबागच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर गेले हाेते. तेथे धावत असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी माझी छेड काढली असे सांगतिले. त्या म्हणाल्या माझ्या दंडाला हात लावून त्यांनी मला ओढत "चलतेस का"? अशी विचारणा केली. स्वतःला वाचविण्यासाठी मी त्यांना प्रतिकार केला.
ज्याने मला हात लावला हाेता त्याला मी लाथ मारून खाली पाडले. त्यातच दुसऱ्याने चाकूने माझ्यावर हल्ला केला. त्यामुळे माझ्या हातास जखम झालीे. मार्शल आर्टमध्ये तरबेज असलेल्या गेडाम यांनी स्वतःचा वाचविण्यासाठी दाेघांवर प्रतिहल्ला करीत त्यांना पळवून लावले.
दरम्यान यापुर्वी देखील संबंधित व्यक्तीने माझा पाठलाग करुन मला त्रास देण्याचा प्रयत्न केला हाेता. त्यावेळी मी त्याकडे दुर्लक्ष केले होते. आज पुन्हा त्याच व्यक्तीने माझी छेड काढत माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने मी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार नाेंदवली आहे असे गेडाम यांनी नमूद केले.
0 Comments