भरदिवसा चोरीच्या इराद्याने आलेल्या चोरट्यांचा डाव फसला; घरमालकानेच एकाला पकडले

 नंदुरबार : भरदिवसा दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास स्टेट बॅंकेच्या मागील बाजूस शिक्षक दाम्पत्याकडे चार ते पाच इसमांनी चोरीचा प्रयत्न केला. परंतु, चोरट्यांनी प्रवेश करून  चोरीचा प्रयत्न करत असताना दीपक जयस्वाल कामा निमित्त घरी आले असता चोरीचा प्रयत्न फसला आहे.

नंदुरबार  शहरात आठवडाभरात दुसरी चोरीच्या प्रयत्न झाल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवड्यात उच्चभ्रू वस्ती असलेल्या घाचीवाडी परिसरात रात्रीच्या सुमारास चड्डी बनियन धारी गँग चोरीचा प्रयत्न करत असताना  सीसीटीव्‍ही कॅमेरात कैद झाले होते. स्टेट बॅंक  परिसर हा नेहमीच गजबजलेला असतो; अशा उच्चभ्रू वस्तीत भरदिवसा घडलेल्या ह्या घटनेने भीती निर्माण झाली असून पोलिसांकडून अजून एका अल्पवयीन संशयित आरोपीला अटक केली असल्याची माहिती मिळाली आहे.

चोरट्यांशी झटापट

चोरटे चोरीच्‍या प्रयत्‍नात असताना दीपक जयस्वाल यांनी चोरट्यांशी दोन हात करत एकाला पकडण्यात यश मिळाले आहे. चोरट्याला पोलिसांनी नव्हे तर प्राफेसरने पकडले अशी एकच चर्चा रंगली असून पकडलेल्या चोरट्याला पोलिसांच्या स्वाधीन केले असून पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e