एलसीबीची माेठी कारवाई; काेयता गॅंगचा म्हाेरक्या अटकेत

आंबेगाव (पुणे) : एका हाॅटलेची  ताेडफाेड करणा-या बहुचर्चित काेयता गॅंगच्या म्हाेरक्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने  जेरबंद केले. या प्रकरणात अद्याप काही संशयित आरोपींचा तपास सुरु असल्याची माहिती पाेलीसांनी दिली
गेल्या आठवड्यात डिंभे येथील हॉटेल सागर बार येथे कोयता गँगमधील पाच ते सहा जणांच्या टाेळक्याने उधारीवरुन दारु मागितली तसेच पैसे देखील मागितले. त्यास हाॅटेलमधील व्यवस्थापनाने नकार देताच टाेळक्याने हॉटेलची तोडफोड केली. त्यामुळे कोयता गँगची दहशत असल्याचे दाखवत धमकावुन दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला गेला अशी तक्रार घोडेगाव पोलीसांत नाेंदविण्यात आली.
त्यानंतर घाेडेगाव पाेलीसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने कोयता गँगच्या म्हाेरक्या अशोक मदगे याला अटक केली. अन्य संशयित आरोपींचा शाेध सुरु असल्याची माहिती पाेलीसांनी दिली.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e