धुळ्यात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला

धुळे शहरातील वडजाई रोड परिसरात कर्जाचा थकीत हप्ता घेण्यासाठी गेलेल्या फायनान्स कंपनीच्या  व्यवस्थापकावर जिवघेणा हल्ला करण्यात आला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा  नोंद झाला आहे.

याबाबत बजाज फायनान्स कंपनीचे मॅनेजर निलेश कैलास चौधरी (वय 23 रा. पंचवटी, गल्ली नं. 8, देवपूर) याने चाळीसगाव रोड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ते रविवारी सायंकाळी वडजाई रोडवरील अबरारी मशिदजवळ असलेल्या मलिका उस्मान खाटीक यांच्याकडे कंपनीचे थकीत कर्जाचे हप्ते मागण्यासाठी गेले होते.

त्याचा राग येवून मलिका उस्मान खाटीक हिच्यासह तिच्या मुलाने लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर व छातीवर मारहाण केली. तसेच मटण कापण्याचा सुर्‍याने उजव्या हातावर मारून गंभीर दुखापत केली. त्यानुसार महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e