लोणावळ्यात आरपीआयचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. यावेळी आठवले यांनी भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. भाजप-मनसे युतीबाबत आठवले यांनी मोठं विधान केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मनसेसोबत युती करणार नाही, असा शब्द दिला होता. आरपीआय आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीत मनसेला घेवू नका.असं झाल्यास भाजपचं देशपातळीवर मोठं नुकसान होईल, असं वक्तव्य आठवले यांनी लोणावळ्याच्या कार्यक्रमात केलं.
पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी सूर्यकांत वाघमारे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर आठवलेंनी पत्रकारांशी बोलताना भाजप-मनसे युतीच्या चर्चेवर भाष्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गट भाजपशी जोडला गेल्याने युतीची ताकद वाढलीय.अशा परिस्थितीत विभिन्न विचारसरणीच्या मनसेसोबत युती करू नये, अशी आरपीआयची भूमिका असल्याचं आठवले म्हणाले. दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवाजी पार्क मैदान मिळावं. यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. मुंबई महापालिकेने खरी आणि ताकदवान शिवसेना कोणती हे पाहून निर्णय घ्यावा, असा सल्लाही आठवलेंनी दिला.
0 Comments