हृदयद्रावक! बहिणीशी झालेले भांडण विकोपाला, सख्ख्या मामानेच केला चार वर्षीय भाच्याचा खून

बीड : परळी तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. बहिणीशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सख्ख्या मामाने चार वर्षीय भाच्याची गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. ही खळबळजनक घटना परळी तालुक्यातील नागापूर येथे घडलीय. लाडेगाव येथील कार्तिक विकास करंजकर असं हत्या झालेल्या बालकाचं नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी तातडीनं तपासकार्य सुरू करून आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत अटक केली. शहानिक लक्ष्मण चिमणकर (२७) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे 
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक आईसोबत आजोळीला गेला होता. त्यावेळी कार्तिकच्या आईचे भाऊ शहानिकसोबत भांडण झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, शहानिकने रागाच्या भरात भाचा कार्तिकच्या गळ्यावर शस्त्राने वार करत त्याचा खून केला. त्यानंतर कार्तिकला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
परंतु, उपचारादरम्यान कार्तिकचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्र वेगाने फिरवत आरोपी शहानिकला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e