भाजपचे प्रतिमेस जोडे मार आंदोलन; आमदार फारुक शहा यांचा केला निषेध

धुळे : भाजपतर्फे धुळे शहराचे आमदार फारुक शहा यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले आहे. जातीवाद करून शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न आमदार फारुक शहा करत असल्याचा आरोप भाजपच्या संतप्त आंदोलकांनी केला आहे. यावेळी आंदोलकांतर्फे आमदार फारुक शहा यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करून आपला निषेध व्यक्त करण्यात आला आहे 

शहराच्या रस्त्यांच्या विकास कामासाठी 30 कोटींच्या निधीला कात्री लावल्याचा आरोप एमआयएमचे  आमदार फारुक शहा यांनी खासदार सुभाष भामरे यांच्यावर लावत कालच खासदार सुभाष भामरे यांच्या प्रतिमेस जोडे मारून अनोख्या पद्धतीने निषेध केला होता. याचे प्रतिउत्तर म्हणून आज भाजपतर्फे आमदार फारुक शहा यांच्या प्रतिमेस जोडे मारून त्यांचा निषेध करण्यात आला आहे.

मोहम्मद पैगंबर जयंती दिनाच्या दिवशी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्यानंतर आमदार फारुक शहा यांनी अक्षपार्य घोषणा देणाऱ्या विरोधात साधे पत्रक देखील काढले नाही. आमदार फारुक शहा जातिवादपणा करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी लावला आहे.

निधीतून ठराविक भागाचाच विकास

त्याचबरोबर आमदार शहा यांच्यातर्फे फक्त मुस्लिम भागातील रस्त्यांचीच सुधारणा व मुस्लिम भागातील विकास कामांनाच प्राधान्य दिले जात असल्याचा देखील आरोप यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांनी लावला. महाविकास आघाडी सरकारतर्फे धुळे शहरातील रस्त्यांच्या विकास कामासाठी आमदार फारुक यांना 30 कोटींचा निधी देण्यात आला. परंतु, आमदार शहा यांच्यातर्फे फक्त ठराविक भागाचाच विकास करण्यात येत असून यामुळेच शहरातील इतर ठिकाणचा विकास होत नसल्यामुळे या 30 कोटींचा निधी शिंदे व फडणवीस सरकारतर्फे रोखण्यात आला असल्याचे स्पष्ट केले आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e