जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर हॉटेल शांताई समोरील रोडवर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क तळेगाव पथकाने सापळा रचून गोवा राज्य निर्मीत आणि केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी आणलेला विदेशी मद्याचा साठा घेऊन जाणाऱ्या भारत बेंझ कंपनीचा ट्रक आडवला. यावेळी पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी मद्य आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हा ट्रक ताब्यात घेतला. क्र.एम एच 47 एफ - 6138 या क्रमांकाचा ट्रक जप्त करुन कारवाई करण्यात आली आहे.
या ट्रकमध्ये रिअल व्हिस्की 750 मि.लीच्या 4 हजार 164 सीलबंद बाटल्या, रिअल व्हिस्की 160 मि.लीच्या 5 हजार 760 सीलबंद बाटल्या, रॉयल ब्ल्यू व्हिस्की 750 मि.लीच्या 9 हजार 600 सीलबंद बाटल्या असे विदेशी मद्याचे एकूण 1 हजार 267 खोके जप्त करण्यात आले. मद्य आणि वाहनासह इतर जप्त मुद्देमालाची किंमत 1 कोटी 5 लाख 7 हजार 520 रुपये इतकी आहे. दरम्यान, या प्रकरणी आणखी काही माहिती मिळते का? याबाबत पोलिस कसून तपास करत आहेत. या प्रकरणात आणखी काही धागे-दोरे हाती लागतात का? याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
0 Comments