याबाबत मोटरसायकल चोरी प्रतिबंध पथकातील पोलीस नाईक विशाल पाटील, मनोहर शिंदे, स्वप्निल जुंद्रे यांना मोटरसायकली चोरणाऱ्या दोघा संशयिताबाबत माहिती मिळाली असता त्यांनी संशयित आरोपी अनिकेत उर्फ सनी नंदराज अहिरे (रा. शरणपूर रोड, नाशिक) व संदीप नामदेव पवार (रा. मोरवाडी, सिडको, नाशिक) या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी नाशिक शहर व नाशिक रोड परिसरात सुमारे ११ मोटरसायकली चोरी केल्याचे कबूल केले.
या सर्व मोटरसायकली त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या आहे. गेल्या जुलै महिन्यापासून या पथकाने आत्तापर्यंत दोन विधी संघर्षित बालक व १९ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून २६ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या ८० मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश नायदे, राजू पाचोरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील तसेच अविनाश देवरे, केतन कोकाटे, विनोद लखन, विशाल पाटील, मनोहर शिंदे, अजय देशमुख, स्वप्निल जुंद्रे, मुश्रीफ शेख, सचिन रामराजे आदींचे अभिनंदन केले आहे.
0 Comments