पारोळ्यात बनावट देशी दारूचा कारखाना उध्वस्त

येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील सत्यनारायण मंदिरासमोर एका गोदामात बनावट देशी दारूचा कारखाना गुप्त माहितीवरून नाशिक दारूबंदी उपायुक्त यांनी छापा टाकून लाखो रुपयाची दारूसह तीन ट्रक, कच्च्या माल यासह दहा ते पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे
याबाबत पारोळा शहरासह तालुक्यात एकच खळबळ माजली असून बनावट दारू बनवण्यात पारोळा तालुका हा अग्रेसर असून यापूर्वीही असे अनेक कारखाने दारूबंदी विभागाने उघड केले आहेत याबाबत रात्री उशिरापर्यंत दारूबंदी अधिकाऱ्यांनी माहिती न दिल्यामुळे सविस्तर माहिती मिळू शकली नाही मात्र या ठिकाणी मोठे घबाड सापडल्याचे बोलले जात आहे यात मोठे दिग्गज आरोपी असल्याचे सांगितले जात आहे हजारो पेटी दारू जप्त केलेली असून पुढील कारवाई सुरू आहे

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e