सोनी सब टीव्हीवरील मालिका ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ची मुख्य अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्माने वसई पूर्वेच्या कामण येथील एका स्टुडिओमधील मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली असून तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तुनिशाने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले होते. तिने करिअरची सुरुवात इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून केली होती.
दरम्यान, याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिने नेमकी आत्महत्या का केली तसेच तिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती का याचा तपास पोलीस करत आहेत.
या मालिकांत केले होते काम
२० वर्षांच्या तुनिषाने भारत का वीरपूत्र-महाराणा प्रताप या सीरियलमधून पदार्पण केले होते. तसेच चक्रवर्तीण अशोक सम्राट, गब्बर पुंछवाला, शेर ए पंजाब महाराजा रणजीत सिंग, इंटरनेट वाला लव्ह आणि इश्क सुभान अल्लाह या शो मध्येही अभिनय केला.याशिवाय तुनिषाने फितुर, बार बार देखो, कहानी-2 दुर्गा राणी सिंग आणि दबंग-3 या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.
0 Comments