धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्याचा खरा चेहरा जगासमोर उघडकीस; पत्नीला का मागावी लागली ट्विटरवर डीजीपीकडे मदत?

मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने थेट आपल्या पोलीस पती विरोधात महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली आहे. मागील तेरा वर्षापासून दुसऱ्या स्त्रीशी संबंध असल्याकारणाने पती मानसिक व शारीरिक छळ करत असल्याची तक्रार या महिलेने केली आहे. पती विरोधात बोरिवलीच्या एम एच बी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी सहकार्य केले नसल्याचा आरोपही या महिलेने ट्विट वरील तक्रारीत केला आहे

मुंबई  पोलीस दलात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याच्या ३८ वर्षीय पत्नीसाठी प्रत्येक दिवस हा संघर्षाचा झाला आहे. २०१९ मध्ये पतीने तिला मोजकीच कपडे आणि भांडी सोबत देऊन सोडून दिल्यापासून रोजच त्यांना जगण्यासाठी लढाई करावी लागत आहे, यानंतर अनेकवेळा पती तिला फक्त भेटण्यासाठी येत असे मात्र खर्चीसाठी पैसे देत नसल्याने पीडितेला शेजाऱ्यांकडून उसनवारी करून दिवस काढावे लागले.पतीच्या या या वागण्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेल्यानंतरही पोलिसांनी सहकार्य केले नसल्याचा पीडितेने केला आहे.

पीडित महीलेचे पती अंधेरी रेल्वे पोलीस स्थानकामध्ये कार्यरत होते आणि पालघर मधील पेलार पोलीस ठाण्यात बदली होण्यापूर्वी एमएचबी कॉलनी पोलीस वसाहतीत राहत होते. मात्र त्याचे पर स्री शी संबंध असल्यामुळे त्याने मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. मागील तेरा वर्षापासून पतीने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करत महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांच्याकडे मदत मागितली आहे.

अखेरीस एम एस बी कॉलनी पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला आहे. यापूर्वी ज्या पोलिसांनी माझी तक्रार ऐकून घेतली नाही त्याविषयी देखील महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडे तक्रार केल्याचं त्यांनी म्हटले आहे. माझे पती पालघर पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांनी एम एच बी कॉलनी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने बेघर घराण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांनी बोरिवली न्यायालयात देखील धाव घेतली आहे.

किमान दोन जणांच्या भाजी भाकरीची सोय करावी उपचारासाठी लागणारा खर्च करावा पण तोही देण्यास माझ्या पतीने नकार दिलेला आहे. त्यामुळे मला पर्याय नसल्याकारणाने न्यायालयात धाव घ्यावी लागली. त्यानंतरही एम एच बी पोलिसांकडून धमक्या येऊ लागल्या. पोलीस माझे म्हणणे ऐकून घेत नाहीत म्हणून मी डीसीबी साहेबांकडे मदतीसाठी गेले मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही, असे पीडित महिलेने सांगितले आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e