अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ येत्या 31 जुलै 2023 रोजी संपणार आहे. या कार्यकाळाला मुदतवाढ मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय मिश्रा यांना याआधी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. आता तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आता सुप्रीम कोर्टाने महत्वपुर्ण निकाल दिला आहे.सुप्रीम कोर्टाने तिसऱ्यांदा मुदतवाढ कायद्यानुसार अवैध असल्याचे म्हटले आहे. तसेच एक वर्षाची मुदतवाढ बेकायदेशीर असल्याचे सुप्रीम कोर्ट म्हणाले आहेत. मुदतवाढ ही कायद्याचे उल्लंघन करणारी असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हणत तिसऱ्यांदा मुदतवाढीला स्थगिती दिली आहे. तसेच संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवणे बेकायदेशीर आहे परंतु ते 31 जुलै 2023 पर्यंत या पदावर कायम राहतील, असे देखील सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक संजय कुमार मिश्रा यांना तिसरी मुदतवाढ देण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने मंगळवारी स्थगिती दिली आहे. तसेच कार्यकाळ वाढवण्याचा अधिकार केंद्र सरकारला नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हणत मोदी सरकारलाही फटकारले आहे. त्यामुळे केंद्रातल्या मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे.
0 Comments