भाजप मंत्र्याचे रोज पुतळे जाळू, शिंदे गटाचा भाजपला इशारा; वादाच्या ठिणगीचे काय आहे कारण

राज्य सरकारमध्ये भाजप व शिंदे गट शिवसेना एकत्र आहेत. मात्र धुळ्यात शिंदे गट शिवसेना व भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पहावयास मिळाली आहे. शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना  आरेला कारे करू असे म्हणत भाजपच्या मंत्र्यांचे रोज पुतळे जाळण्याचा गंभीर इशाराच दिला आहे. 
एकीकडे राज्य सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर भाजप व शिंदे गट एकत्र येऊन आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांना  रोखण्याच्या तयारीत जुंपलेले आहेत. तर दुसरीकडे धुळ्यात मात्र या युतीत मिठाचा खडा पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात धुळ्यात भाजप व शिंदे गटात पडलेला मिठाचा खडा दूर करण्यात वरिष्ठ पातळीवरून हस्तक्षेप केले जातील का हे बघणं अवचित्याचे ठरणार आहे.
सामंतांचा पुतळा जाळल्यावरून पडली ठिणगी 

धुळे जिल्ह्यातील नरडाणा येथे केमिकल फॅक्टरीला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी परवानगी दिली. यावरून नरडाणा येथील शेतकरी आक्रमक होऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. या निषेध आंदोलनामध्ये भाजपचा देखील सहभाग असल्याचे बघावयास मिळाले होते. यावरून शिंदे गट शिवसेनेचे पदाधिकारी देखील आक्रमक झाले असून निषेध करण्याची पद्धत चुकीची असल्याचं म्हतळे आहे. अशा पद्धतीने मंत्र्यांचे पुतळे दहन करून निषेध आंदोलन केले जाणार असेल, तर यापुढे भाजपच्या नेत्यांचे देखील पुतळे दहन करू; अश्या पद्धतीने शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असे शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना इशाराच दिला आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e